IMG-LOGO
महाराष्ट्र

MPSC मायाजाल आहे म्हणत तरुणाची आत्महत्या

Sunday, Jul 04
IMG

मला माफ करा… 100 जीव वाचवायचे होते. पण डोनेशन करून 72 राहिले. जमलं तर इतरांपर्यंत पोहचवा. अनेक जीव वाचतील.

पुणे, दि. ४ जुलै : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने स्वप्निल लोणकरने आत्महत्या केली. अवघ्या 24 वर्षीय तरुणाने अशाप्रकारे जीवन संपवल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या स्वप्निलने सुसाईड नोटच्या सुरुवातीलाच MPSC मायाजाल आहे, यात पडू नका असे म्हटलं आहे.काय आहे सुसाईड नोटमध्ये ?…'MPSC मायाजाल यात पडू नका'Mpsc मेन्स 2019Add- 2019जूनला प्री क्रॅक केलीनोव्हेंबरला मेन्स क्रॅक केलीदिड वर्षांपासून मुलाखत पेंडीग…Mpsc 2020Add- मार्च 2020प्री- मार्च क्लेअरमेन्स- पेंडीग' येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जात. Confidense तळाला पोहचतो आणि self doubt वाढत जातो. दोन वर्षे झालेत पास होऊन आणि वय 24 संपत आल आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेल कर्ज खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना.कोरोना नसता सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या. तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असत. 'मी घाबरलो, मी खचलो अस मुळीच नाही. मी फक्त कमी पडलोय, माझ्याकडे वेळ नव्हता. नकारात्मकतेची वादळ ही कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य कॅन्टीन्यू होऊ शकेल अस काही उरलेल नाही. याला कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे.मला माफ करा… 100 जीव वाचवायचे होते. पण डोनेशन करून 72 राहिले. जमलं तर इतरांपर्यंत पोहचवा. अनेक जीव वाचतील.

Share: