IMG-LOGO
महाराष्ट्र

'इथे मराठी उमेदवारांचे स्वागत नाही' मुंबईतील एका कंपनीच्या जाहिरातीने खळबळ

Monday, May 06
IMG

'इथे मराठी उमेदवारांचे स्वागत नाही' असेही नमूद करण्यात आल्याने वातावरण तापले.

मुंबई, दि. ६ : गुजरातमधील एका भरती करणाऱ्या कंपनीच्या एचआरकडून मुंबईतील गिरगावमधील कार्यालयासाठी ग्राफिक डिझायनर हवा असल्याचीजाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. साडेचार लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्नही देण्यात येणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. मात्र या जाहिरातीच्या अखेर 'इथे मराठी उमेदवारांचे स्वागत नाही' असेही नमूद करण्यात आल्याने वातावरण तापले. विशेष म्हणजे मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर असलेल्या मुंबईत तेही गिरगावमधील कार्यालयासाठी अशी जाहिरात पोस्ट करण्यात आल्याने उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या.  शरद पवार गटाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही जाहिरात पोस्ट करत 'मुंबईत राहून मराठी माणसाचा द्वेष. धडा शिकवा', असे आवाहन केले आहे. अनेक युजर्सकडून या जाहिरातीविरोधात आवाज उठविण्यात आला आहे. 

Share: