IMG-LOGO
नाशिक शहर

मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणूकीतून माघारीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा; समता परिषदेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर

Tuesday, Apr 23
IMG

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली.

नाशिक, दि.२३ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटून देखील राज्यातील नेतृत्वाने उमेदवारी जाहीर न झाल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून माघारीचा निर्णय मागे घेऊन नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची दिल्लीत आवश्यकता आहे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने बैठकीत करण्यात आली.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदासंघांतून उमेदवारी करावी असा सर्वांचा आग्रह आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य आहे असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी विदर्भ ब्राम्हण विकास मंच नाशिकच्या वतीने सचिव रुपेश जोशी यांच्या शिष्टमंडळाने मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, शहराध्यक्ष कविताताई कर्डक, महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, महिला शहराध्यक्ष आशा भंदुरे, अंबादास खैरे, योगेश निसाळ, संतोष खैरनार, दिलीप तुपे, गजू घोडके, ज्ञानेश्वर महाजन, नाना पवार, शिवा काळे, ज्ञानेश्वर शेवाळे, नितीन गायकवाड, रुपेश जोशी, अमोल नाईक, सुनील पैठणकर, प्रशांत लोहार, राजेंद्र जगझाप, किशोरी खैरनार, मेघा दराडे, मीनाक्षी काकळीज यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.देशभरात ओबीसी बांधवांसाठी काम करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय नेतृत्वाने त्यांची दखल घेऊन त्यांना निवडणूक लढण्यास आग्रह धरला ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेसाठी अभिमानाची बाब आहे. केंद्रीय नेतृत्वाची घेतलेली दखल लक्षात घेऊन आपण संयमी भूमिका ठेवावी. नाशिकच्या विकासासाठी व ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी मंत्री छगन भुजबळ यांची दिल्लीत आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांचे नेतृत्व हे दिल्लीत असावे. तसेच याबाबत मंत्री छगन भुजबळ हे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असे मत प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक यांनी व्यक्त केले. यावेळी प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ.योगेश गोसावी, कविताताई कर्डक, आशा भंदुरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त व विविध समाजाच्या बांधवानी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी भालचंद्र भुजबळ, अमर वझरे, प्रसाद सोनवणे, रोहिणी रोकडे, विकास मोरे, नितीन रास्कर, अजय बागुल, विशाल म्हस्के, रामेश्वर साबळे, धनंजय थोरात, नितीन शेलार, विनायक माळी, हेमंत सोनवणे, संदीप दिघोळे, अर्जुन आहिरे, सुभाष गांगुर्डे, सचिन सोनवणे, हिमांशू देवरे, धीरज सारडा, राहुल घोडे, योगेश देवरगावकर, विशाल चव्हाण, सुनील अंकार, सागर गोरे, रमेश खैरनार, विकास गवते, किशोर गरड, संतोष पुंड, गणेश गवळी, विनायक माळी, अमोल आव्हाड, प्रितम मुर्तडक, प्रवीण आव्हाड, अमोल पैठणकर, शिवराज नाईक, गौरव पाटील, हरीष महाजन, संतोष भुजबळ,उपेश कानडे, विशाल नाईक, योगेश मोरे, बंटी जाधव, डॉली निकाळे, योगिता पाटील, रोहिणी रोकडे, लता नागरे, संजीवनी जाधव, सुजाता खैरनार, आश्विनी मोगल, निर्मला सावंत, कृष्णा मंडलिक, मनीषा अहिरराव, ललित निकम, रुपाली बेदमुथा, गीता तोकडे, शीतल रहाणे, अलका कस्तुरे, निशा झनके, प्रकाश महाजन, अशोक मंडलिक, सतीश सूर्यवंशी, अॅड.चिन्मय गाढे, रेहान शेख, संदीप खैरनार, मोनिम जगताप, सतीश निकुंभ, यशवंत दळवी, सिद्धार्थ भामरे, रवींद्र तारडे, बाळू कान्हव, राहुल जाधव, प्रमोद साळवे, सुभाष जाखेरे, यशवंत कात्रे, शशिकांत बागुल, प्रकाश खैरनार,कौतिक गांगुर्डे, ज्योती गांगुर्डे, मंदाकिनी खैरनार, मुज्जफर शेख यांच्यासह समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share: