IMG-LOGO
महाराष्ट्र

Nana Patole Accident : नाना पटोले यांच्या कारचा भीषण अपघात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघाताची शक्यता

Wednesday, Apr 10
IMG

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडला असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भंडारा, दि. १० : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भीषण अपघात झाला आहे. ते भंडारा येथून परत येत असतांना त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली. या अपघातात त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला असून ते थोडक्यात बचावले आहेत. ही घटना भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ घडली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रचार आटपून सुकळी या गावी जात असताना त्यांच्या गाडीला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पुढील तपासास सुरुवात केली आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडला असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही जणांनी हा घातपात असू शकतो असे म्हटले आहे. 

Share: