IMG-LOGO
नाशिक शहर

Nashik : ICICI बँक होम फायनान्सच्या सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी ९२ लाखांचे दागिने लंपास

Monday, May 06
IMG

शनिवारी एका ग्राहकाचे सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी गेले असताना लॉकर उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

नाशिक, दि. ६ : आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या जुना गंगापूर नाका शाखेत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. सेफ्टी लॉकर किल्लीने उघडून ४ कोटी ९२ लाखांचे दागिने लंपास करण्यात आलेत. दरम्यान, हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या कार्यालयात  सेफ्टी लॉकरमध्ये २२२ ग्राहकांचे १३,३८५.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवले होते. शनिवारी एका ग्राहकाचे सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी गेले असताना लॉकर उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापक रणजित देशमुख यांना लॉकरमध्ये सोने नसल्याबाबत माहिती दिली. बँकेचे व्यवस्थापक रणजित देशमुख यांनी जयेश कृष्णदास गुजराथी यांना माहिती दिली. जयेश यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Share: