IMG-LOGO
नाशिक शहर

राज्यातील राजकीय घडामोडींची पाळेमुळे ५२ व्या घटनादुरुस्तीत : ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. अणे

Sunday, May 05
IMG

वसंत व्याख्यानमालेत अँड. द. तु. जायभावे स्मृती व्याख्यानात ते 'पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाटा व उपाय' या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि. ५ : शिवसेनेतील फुट आणि राष्ट्रवादीतील फुट यामध्ये फरक आहे. 52 व्या घटनादुरुस्तीद्वारे पात्रतेचे निकष लागु झाले. त्याचे अधिकार सभापतींना प्राप्त झाले. मात्र यामध्ये सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेप केला होता. याचाच संदर्भ राज्यातील घडामोडींमध्ये आढळतो. असे प्रतिपादन नागपुर येथील ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. श्रीहरी अणे यांनी केले. वसंत व्याख्यानमालेत अँड. द. तु. जायभावे स्मृती व्याख्यानात ते 'पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाटा व उपाय' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. अँड. जायभावे यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. अँड. जयंत जायभावे यांनी परिचय करून दिला. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, एम.टी.क्यु. सय्यद, अँड. राहुल खुटाडे व्यासपीठावर उपस्थित होते. अँड. शिंदे यांनी अँड. अणे यांचा यांचा सत्कार केला.श्री. अणे  म्हणाले की, पक्षांतर बंदी हा तसा अवघड आहे. महाराष्ट्रात 2022 ते 24 या काळात घडलेल्या राजकीय घडामोडींचा त्यांनी आढावा घेतला. हा आढावा म्हणजे राजकीय लोकांनी कोरोना काळात रिकाम्या डोक्याने केलेल्या विचारांचा परिपाक होता, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी एक बैठक घेऊन एकनाथ शिंदे यांना सभागृह नेता पदावरून काढुन टाकण्यात आले. त्याचवेळी व्हिप पदावरही श्री. गोगावले यांची निवड झाली. दुसऱ्या एका बैठकित या दोघांनाही पदावरून काढुन टाकण्यात आले. या सारख्या विविध घटना या काळात घडत होत्या. या सर्व घटनांचा परिणाम म्हणजे महाविकास आघाडी सरकार पडले. मात्र शरद पवार यांनी अनेक वेळा सांगूनही श्री. ठाकरे यांनी राजीनामा देऊन मोठी चुक केली. त्यातून पद निर्माण झाले आणि विरोधकांना मैदान मोकळे झाले. तितक्याच तातडीने महायुतीचे सरकार स्थापन झाले. या काळात दोन्ही गट आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत होते. व्हीप वर व्हीप निघत होते. अखेर नवे सरकार अस्तित्वात आले. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेबाहेर फेकले गेले. त्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादीतही अशाच घटना घडल्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही एक गट सत्तेत सहभागी झाला. 10 th Sheduld, पात्रतेचे निकष आणि एकमेकांविरुद्ध नोटीस बजावणे यासारख्या मुद्द्यावरही त्यांनी त्यांनी प्रकाश टाकला.सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गाण्यांच्या कार्यक्रमात आज हरिषभाई ठक्कर व अफलातुन ग्रुप प्रस्तुत ' मुरकी अर्थात मुकेश, रफी व किशोरकुमार यांच्या सुमधुर व सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, उपाध्यक्षा संगीता बाफणा, चिटणीस हेमंत देवरे यांच्यासह  पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Share: