IMG-LOGO
नाशिक शहर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली गंगापूजनसह महाआरती

Friday, Jan 12
IMG

दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गंगापूजन करून रामतीर्थ येथे दर्शन घेत विधीवत पूजा व आरती केली. भारत विश्वगुरू होऊ दे, असा संकल्प त्यांनी यावेळी केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली गंगापूजनसह महाआरतीदक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गंगापूजन करून रामतीर्थ येथे दर्शन घेत विधीवत पूजा व आरती केली. भारत विश्वगुरू होऊ दे, असा संकल्प त्यांनी यावेळी केला.यावेळी गंगा पुरोहित संघाच्या वतीने अध्यक्ष व विश्वस्त यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना चांदीचा अमृत कलश, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शंकर शुक्ल, दिलीप शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, प्रतिक  शुक्ल, वैभव दिक्षित, चंद्रशेखर  गायधनी, शेखर  शुक्ल, अतुल गायधनी, अमित पंचभैये, वैभव बेळे, भालचंद्र शौचे, उपेंद्र देव आदीसह पुरोहित संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share: