या निवडणुकीत ठाकरे महायुतीत सामील होणार का; की स्वतंत्र उमेदवार उभे करणार या कडे आता सर्वांच्या नजरा लागून आहेत.
मुंबई, दि. ९ : गुढीपाडव्यानिमित्त आज शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आज राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापले असतांना राज ठाकरे हे महायुतीत जाण्याची चर्चा होती. ठाकरे हे दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांना देखील भेटले. असे असले तरी अद्याप महायुतीत बाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज या चर्चांना राज ठाकरे हे पूर्ण विराम देण्याची शक्यता आहे. आता या निवडणुकीत ठाकरे महायुतीत सामील होणार का; की स्वतंत्र उमेदवार उभे करणार या कडे आता सर्वांच्या नजरा लागून आहेत.