IMG-LOGO
महाराष्ट्र

तुम्ही देशाची प्रतिमा मलिन करत आहात; ॲड.उज्ज्वल निकम यांनी विजय वडेट्टीवार यांना सुनावले

Monday, May 06
IMG

निराधार आरोप करून विरोधी पक्षनेते २६/११ च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा अनादर करत आहेत.

मुंबई, दि. ६ : आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे विधान वडेट्टीवार यांनी केले. त्यानंतर पुन्हा या विधानावर स्पष्टीकरण देताना वडेट्टीवार म्हणाले, “आपण हे एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन बोललो आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावर आता विजय वडेट्टीवार यांनी निराधार आरोप केले असून याबद्दल मला वाईट वाटतंय. यामुळे पाकिस्तान सरकारला फायदा होऊ शकतो. ते असे दावे कशाच्या आधारे करत आहेत हे मला माहीत नाही. राजकारणात गुंतून तुम्ही आमच्या देशाची प्रतिमा मलिन करत आहात याचं आश्चर्य वाटतं”, असं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत. निराधार आरोप करून विरोधी पक्षनेते २६/११ च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा अनादर करत आहेत. ज्यांना माझ्या उमेदवारीची भीती वाटते ते अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत”, असेही उज्ज्वल निकम म्हणाले. फाशीपूर्वी कसाबने एका न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कबूल केले होते की मुंबई हल्ल्याच्या वेळी त्याने आणि लष्कर-ए-तैयबाचे भरती इस्माईल खान यांनी पोलिस जीपवर अंदाधुंद गोळीबार केला होता, ज्यामुळे करकरे आणि पोलीस पथकातील इतर दोघांचा मृत्यू झाला होता.मुंबई दहशवादी हल्ला प्रकरणी न्यायालयामध्ये जे पुरावे सादर करायला हवे ते उज्ज्वल निकम यांनी सादर केले नाही”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या विधानावरुन राजकारण तापले आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामधून भाजपाने उज्ज्वल निकम यांना लोकसभेचे तिकीट दिलेले आहे.

Share: