IMG-LOGO
महाराष्ट्र

सोलापुरातून महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; प्रणिती शिंदे यांच्या नावाची औपचारिकता

Tuesday, Mar 19
IMG

सोलापूरमधून मी लोकसभा लढवणार आहे. माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता आहे. काही दिवसांत माझी उमेदवारी जाहीर होईल.

सोलापूर, दि. १९ : सोलापुरातून महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांचे नाव अंतिम असल्याचे स्पष्ट आहे. पण भाजपकडून मात्र कोण लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाविकास आघाडीकडून सोलापूरच्या उमेदवारीवर अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी त्या ठिकाणी प्रणिती शिंदे यांनाच उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झाले आहे. सुशील कुमार शिंदे म्हणाले, मला एकदा राज्यसभा, दोनदा लोकसभेच्या सभागृहात पाठवले.  मी एससी कॅटगिरीचा असताना मला ओपनच्या जागेवरून निवडून दिले. मात्र जागा राखीव झाल्यावर मला पाडले. असे कसे झाले माहिती नाही, देशात लोकशाही टिकवायची आहे की, हुकूमशाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. प्रणिती सारख्या विद्वान लोकप्रतिनिधीला संसदेत पाठवून पुन्हा एकदा सोलापूरचा नावं दिल्लीत गाजवू द्या. असंही शिंदे यांनी यावेळी सांगितले. प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूरमधून मी लोकसभा लढवणार आहे. माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता आहे. काही दिवसांत माझी उमेदवारी जाहीर होईल. आमचा उमेदवार ठरला आहे. परंतु, त्यांचं कधी ठरणार ते माहिती नाही. देशात लोकशाही आहे. त्यामुळे इथे कोणी कोणाला घाबरू नये. आम्ही निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत कारण आमचं आता ठरलंय. असेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

Share: