IMG-LOGO
लोकसभा २०२४

लोकशाहीचा उत्सव : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६२.३७ टक्के तर महाराष्ट्रात सरासरी ५७.८२ टक्के मतदान

Saturday, Apr 20
IMG

पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर या मतदार संघात मतदान झालं.

नवी दिल्ली, दि. २०  : उष्णतेची लाट असूनही शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६२.३७ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांमध्ये सरासरी ५७.८२ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ७० टक्के मतदान झाले होते. त्यातुलनेत यावेळी ७ टक्के कमी मतदान झाले. मतदानात पश्चिम बंगालने बाजी मारली. पश्चिम बंगालमधअये तब्बल ७७.५२ टक्के मतदान झालं. तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. बिहारमध्ये ४६.३२ टक्के मतदान झालं. महाराष्ट्रात आज पहिल्या टप्प्यात ५ लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर या मतदार संघात मतदान झालं. अंदमान-निकोबार- ५६.८७, अरुणाचल प्रदेश- ६७.१५, आसाम- ७२.१०, बिहार-४८.५०, छत्तीसगढ-६३.४१, जम्मू-काश्मीर- ६५.०८, लक्षद्वीप-५९.०२, मध्य प्रदेश-६४.७७, महाराष्ट्र- ५७.८२, मणिपूर-६९.१३, मेघालय- ७४.२१, मिझोराम-५४.२३, नागालँड-५६.९१, पुडुचेरी-७३.५०, राजस्थान-५६.५८, सिक्कीम-६९.४७, तामीळनाडू-६५.१९, त्रिपुरा-८०.१७, उत्तर प्रदेश-५८.४९, उत्तराखंड-५४.०६, पश्चिम बंगाल-७७.५७ टक्के मतदान झाले आहे. कमी झालेले मतदान कोणाला फटका देईल याची उत्सुकता कायम आहे. 

Share: