IMG-LOGO
राष्ट्रीय

नोबेल विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचे निधन

Wednesday, Apr 10
IMG

पीटर हिग्ज यांनी ८ एप्रिलला दीर्घ आजाराने वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

मुंबई, दि. १० : ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांनी हिग्ज-बोसॉन कण म्हणजेच गॉड पार्टिकल शोधला होता.गॉड पार्टिकलचा शोध लावल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या बोसोन सिद्धांताला संयुक्तपणे भौतिक शास्त्रातलं नोबेल मिळालं आहे. एडनबर्ग विद्यापीठाने एक इमेल करुन पीटर हिग्ज यांच्या निधनाची माहिती दिली आहे. स्कॉटिश विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. या विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार पीटर हिग्ज यांनी ८ एप्रिलला दीर्घ आजाराने वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

Share: