पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. त्यामुळे हा प्रश्न येणार नाही. परंपरा खंडित केली अशीही भावना येणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.
बारामती, दि. ९ : अजित पवार यांनी बारामतीमधील सभेत लेकीला निवडून दिलं आता सूनेला निवडून द्या असं आवाहन केलं. "अनेकांसमोर बाकी प्रसंग उभा राहिला आहे. तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीमागे उभे राहिला आहात. ज्या ठिकाणी पवारांचं नाव असेल त्याच्या समोरचं बटण दाबायचं आहे. १९९१ ला मला निवडून दिलं. त्यानंतर वडिलांना म्हणजे साहेबांना निवडून दिलं. आता लेकीला (सुप्रिया सुळे) निवडून दिलं. आता सुनेला निवडून द्या म्हणजे मुलगा, वडील, लेक, आणि सूनही खुश," असं मिश्कीलपणे अजित पवार म्हणाले आहेत. अनेकजण माझं 84-85 वय झाल्याचा उल्लेख करत आहेत. तुम्ही माझं वय काढू नका, तुम्ही अजून काय पाहिलं आहे? हा गडी थांबणारा नाही. ज्यांनी साथ दिली त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनहिताची कामं करणार," असा निर्धारच शरद पवारांनी व्यक्त केला आहे. “बारामतीमध्ये मतं मागण्याची काहीतरी लेव्हल होती. ही लेव्हल आता सोडायला लागले आहेत. आणि त्यातून लोकांना भावनिक केलं जातंय. त्यातून काही सांगितलं जातंय. नुसतं संसदेत भाषणं करून माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही. मतदानाच्या दिवशी पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. त्यामुळे हा प्रश्न येणार नाही. परंपरा खंडित केली अशीही भावना येणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.