IMG-LOGO
जीवन शैली

कोरोनाच्या भीतीने 27 टक्के लोकांना ग्रासले नैराश्याने

Wednesday, May 12
IMG

’सोशल मीडिया’वर येणार्‍या निगेटिव्ह पोस्ट्समुळे लोकांना नैराश्याच्या दिशेने नेले जाते.

मुंबई, दि. १२  मे :  कोरोना झालेल्यापैकी अनेक जण मानसिक त्राग्याने आत्महत्येचा मार्ग पत्करतात. काही जण खचून जातात; परंतु काही जणांच्या मनात कायम कोरोना होण्याच्या भीतीने नैराश्य आले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 55 टक्के लोकांच्या मनात कोरोनाची भीती सतत असते, असे मान्य केले.मुरादाबाद येथे राहणारा कंत्राटदार शाहिद अली याने स्वत: ला घरातच बंदिस्त केले आहे. कोरोना संसर्गाबद्दल ते कोणतीही बातमी पाहत नाहीत किंवा कोणाशीही बोलत नाहीत. विषाणूचे नाव येताच ते चिंताग्रस्त होऊ लागतात. नोएडा येथे राहणारे सेवानिवृत्त सुशील कुमारही त्याच स्थितीत आहेत. दुसर्‍या लाटेत ते घराबाहेर पडलेले नाही. एखाद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचते, तेव्हा ते त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी करू लागतात. बिजनौर येथे राहणार्‍या सुरेंद्र सिंग यांना कोरोनाशी संबंधित बातमी पाहिल्यास झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात. त्याचे हात पाय फुगू लागतात. दिल्लीत राहणारी 30 वर्षीय पूजा कुमारी यांच्या घरात अद्याप कोणालाही संसर्ग झालेला नाही; परंतु ती इतकी घाबरली आहे, की तिने घरात आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी गोळा करण्यास सुरवात केली आहे. ती ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. ती पुन्हा पुन्हा म्हणते, ’तिसरी लाट आणखी धोकादायक होईल. मुलेही असुरक्षित असतील.कोरोनाच्या अशा वातावरणामुळे लोकांमध्ये नैराश्य आणि चिंता वाढली आहे. कोविडने समाज कायमचा बदलला आहे, असे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एक प्रकारे हा मानसिक साथीचा रोगदेखील आहे. कोरोनाहून बरे झालेले अनेक जण नैराश्याने ग्रस्त आहेत. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. समीर मल्होत्रा आणि त्यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी देशभरात एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये एक हजाराहून अधिक भारतीयांनी भाग घेतला. यात सहभागी झालेल्यांपैकी 55 टक्के लोक घाबरून गेले आहेत. 27 टक्के लोकांना औदासिन्याने घेरले आहे. ऑक्सिजनची कमतरता आहे, रूग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, अशा बातम्यांनी लोक त्याबद्दल घाबरून गेले आहेत. हा प्रश्‍न वारंवार त्याच्या मनात उमटत असतो, की असे काही आपल्या बाबतीत घडले तर आपण काय करू? जे कोरोनामुक्त झाले किंवा ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांनादेखील नैराश्याने ग्रासले आहे. लोकांची चिंता अधिक वाढल्यास ते नैराश्याला बळी पडू शकतात.’सोशल मीडिया’वर येणार्‍या निगेटिव्ह पोस्ट्समुळे लोकांना नैराश्याच्या दिशेने नेले जाते. बेडस्, ऑक्सिजन, औषधे, प्लाझ्मा या गोष्टी लोकांना उपलब्ध नसतील तर अधिक लोक कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंडमध्ये येत आहेत. कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूमुळे लोकांमध्ये खूप राग, खूप अपूर्णपणा आणि खूप नैराश्य येत आहे. लोक त्यांची ऑक्सिजनची पातळी वारंवार तपासत आहेत, हेदेखील औदासिन्याचे एक कारण आहे. लोकांना रात्री झोप नीट होत नाही. घाबरुन जात आहेत. हृदयाचा ठोका वेगवान होत आहे. त्यांना श्‍वास घ्यायला त्रास होत आहे.

Share: