IMG-LOGO
साहित्य संस्कृती

आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

Friday, Sep 11
IMG

आचार्य विनोबा भावे हे गांधीविचारांचे सच्चे पाईक होते. महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून केलेली निवड त्यांनी सार्थ ठरवली.

मुंबई, दि. ११ सप्टेंबर : ‘महात्मा गांधीजींचे आध्यात्मिक वारसदार’ आणि ‘गांधी विचारांची प्रयोगशाळा’ असा ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख होतो ते थोर गांधीवादी नेते, भारतरत्न, आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसेच्या मार्गाने चालत विचार परिवर्तनातून समाजपरिवर्तन घडवणं, हीच आचार्य विनोबा भावे यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आचार्य विनोबा भावे हे गांधीविचारांचे सच्चे पाईक होते. महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून केलेली निवड त्यांनी सार्थ ठरवली. गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनापासून सुरु झालेला प्रवास सर्वोदय चळवळीपर्यंत नेत त्यांनी देशात समाजपरिवर्तन घडवलं. ग्रामस्वराज्याचा प्रयोगाचं भूदान चळवळीत यशस्वी रुपांतर केले. जनतेच्या हृदयपरिवर्तनातून भूमीहिनांना लाखो एकर जमीन मिळवून देण्याचं ‘भूदाना’चं कार्य केवळ विनोबाजींनाच शक्य झालं आहे. गांधीविचारांना प्रत्यक्ष कृतीत आणणारे, समाजपरिवर्तन घडवणारे आचार्य विनोबाजी हे महान संत, थोर राष्ट्रभक्त, कृतीशील विचारवंत होते. त्यांच्या जयंतीनिमित्त माझे विनम्र अभिवादन, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Share: