IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Lok Sabha Elections 2024 Phase 5 : मुंबईत मतदान संथगतीने; सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी

Monday, May 20
IMG

उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

मुंबई, दि. २० : मुंबईतल्या अनेक मतदान केंद्रावर अत्यंत संथ गतीनं मतदान पार पडलं. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालय. गरज भासली तर पहाटेपर्यंत मतदान करा असं उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलय. तर दुसरीकडे फडणवीस यांनी महाविकास आघाडी आता हरण्याची पार्श्वभूमी तयार करत असल्याची टीका केली आहे.पहाटेपर्यंत मतदान करा काही निवडणूक केंद्रावर जाणूनबुजून अधिकारी मतदानाला उशीर करत आहेत. मतदारांना वेळेत मतदान करता येऊ नये, यासाठी संथ गतीनं मतदान प्रक्रिया करत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. अशा अधिकाऱ्यांना सोडू नका, मतदारांनी पहाटेपर्यंत मतदान केलं पाहिजे असंही ठाकरे म्हणाले.- उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांचं रडगाणं सुरूउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबईत संथ गतीनं मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली असल्याचं सांगत ते म्हणाले की, आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचं रडगाणं सुरू केलं आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे सुरू केलय. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Share: