IMG-LOGO
मनोरंजन

आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट

Saturday, Jul 03
IMG

15 वर्षा सुंदर वर्षात आम्ही एकत्र जीवनभरातील अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं आहे.

मुंबई, दि. ३ जुलै : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव विभक्त होणार आहेत. (Aamir Khan and Kiran Rao announce divorce after 15 years of marriage) 15 वर्ष संसार केल्यानंतर दोघे घटस्पोट घेणार आहेत. दोघांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे याची घोषणा केली. यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे की, ' या 15 वर्षा सुंदर वर्षात आम्ही एकत्र जीवनभरातील अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं आहे आणि आमचं नातं केवळ विश्वास, सन्मान आणि प्रेमामुळं वृद्धिंगत झालं आहे. आम्हाला आयुष्यात नवीन अध्यायाची सुरुवात करायची आहे- आता नवरा बायको म्हणून नाही तर सह-पालक आणि एकमेकांचं कुटुंब म्हणून'. 'आम्ही काही काळापासून विभक्त होण्याची योजना आखत होतो. वेगळे राहणार असलो तरी आम्ही आमचं आयुष्य एक विस्तारीत कुटुंब म्हणून शेअर करू. आम्ही आमचा मुलगा आझाद यासाठी एक समर्पित पालक आहोत ज्याचं पालन-पोषण आम्ही एकत्र करू. आम्ही चित्रपट, पानी फाउंडेशन आणि ज्याबद्दल आम्ही भावुक आहोत अशा प्रकल्पांसाठी सहकारी म्हणून काम करत राहू'.जवळपास 15 वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी हे नातं संपुष्टात आणलं आहे. (Aamir Khan-Kiran Rao announce divorce, to co-parent son Azad)  शनिवारी या दोघांनीही त्यांच्या या निर्णयाची अधिकृत घोषणा केली.

Share: