IMG-LOGO
मनोरंजन

गायक सिद्धू मुसेवालाच्या ५८ वर्षांच्या आईने दिला मुलाला जन्म; बालकौर सिंग पोस्ट करत म्हणाले...

Sunday, Mar 17
IMG

सिद्धू मुसेवालाची २९ मे २०२२ रोजी हत्या करण्यात आली होती. गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोई यांनी ही हत्या केल्याचं समोर आलं होतं.

मुंबई, दि. १७ : गेल्या काही दिवसांपासून सुप्रसिद्ध दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला व त्याचं कुटुंब चर्चेत आहे. सिद्धू मुसेवालाची ५८ वर्षांची आई चरण कौर गर्भवती असल्याचं वृत्त समोर आले होते. काहींनी ही बातमी चूकीची असल्याचे म्हटले होते. मात्र आता बलकौर सिंह यांनी नुकत्याच केलेल्या पोस्टमुळे अखेर मुसेवालाच्या घरी एका गोंडस मुलाचे आगमन झाले आहे. सिद्धू मुसेवालाची २९ मे २०२२ रोजी हत्या करण्यात आली होती. गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोई यांनी ही हत्या केल्याचं समोर आलं होतं. त्याच्या हत्येनंतर त्याचे आई-वडील मात्र एकटे पडले होते. त्यामुळे IVF च्या मदतीने त्यांनी पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला होता. शुभ सकाळ, लाखो-कोट्यवधी चाहत्यांच्या व ईश्वराच्या आशीर्वादाने आमच्या घरी सिद्धूच्या छोट्या भावाचं आगमन झालं आहे. ईश्वराच्या कृपेनं कुटुंब निरोगी आहे आणि सर्व चाहत्यांच्या अमाप प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे.” असे सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Share: