IMG-LOGO
मनोरंजन

अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

Sunday, May 30
IMG

29 मे रोजी कादंबरीचं कोरोनामुळे निधन झालं. भूषण आणि कादंबरीला प्रकिर्त नावाचा लहान मुलगा आहे.

मुंबई, दि. ३० मे : विनोदी अभिनेता भूषण कडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे भूषणच्या पत्नीचं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच भूषणची पत्नी कादंबरी कडू यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. ३९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.29 मे रोजी कादंबरीचं कोरोनामुळे निधन झालं. भूषण आणि कादंबरीला प्रकिर्त नावाचा लहान मुलगा आहे. कादंबरी ही सोमय्या कॉलेजमधील विद्यार्थिनी असून ती देखील कला क्षेत्राशी निगडीत होती. ती नाटकाचं बॅक स्टेज सांभाळत असे. भूषणची पत्नी 'बिग बॉस'च्या घरात असतेवेळी सर्वांसमोर आली होती. आपल्या विनोदी शैलीच्या अभिनयासोबतच मनमिळाऊ स्वभावासाठी हा अभिनेता कायमच सर्वांची मने जिंकत असतो. पण, इतरांच्या आनंदासाठी कला सादर करणाऱ्या या कलाकावर आता मात्र ही काय वेळ आली, असेच म्हणत अनेकांनीच त्याच्या दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे.

Share: