IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Loksabha Election 2024 III : अभिनेता रितेश देशमुख यांनी पत्नी जेनेलिया, आई वैशाली देशमुख यांच्यासह बजावला हक्क

Tuesday, May 07
IMG

राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली यांनीही मतदान केलं.

लातूर, दि. ७ : रितेश देशमुख आपल्या कुटुंबासह लातूरला मतदान करण्यासाठी पोहोचला. रितेश देशमुख पत्नी जेनेलिया, आई आणि भाऊ धीरजसह मतदान केंद्रावर पोहोचला. यावेळी जेनिलिया देशमुख हिच्या लुकने लोकांचं लक्ष वेधलं. जेनेलिया देशमुख पिवळ्या रंगाची साडी आणि हातात  हिरवा चुडा घालून मतदान केंद्रावर दाखल झाली.  रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबईहून लातूरला रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत रितेश देशमुखची आई आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली यांनीही मतदान केलं. 

Share: