माझ्या काका काकींचं घर आहे. मी काका काकींच्या घरी आले आहे. असेही सुळे यांनी म्हटलं आहे.
बारामती, दि. ७ : सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बारामतीमधून थेट काठेवाडी गाठत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना ही भेट कौटुंबिक असल्याचं म्हटलंय. मी आशा काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आले होते. मी फक्त काकींना भेटण्यासाठी आले होते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे. इथं माझं नेहमीचं येणं जाणं असतं. त्याप्रमाणे मी आजही आले. घरातील वरिष्ठांचा आशीर्वाद मी नेहमीच घेते. त्याप्रमाणे आजही आले. हे माझ्या काका काकींचं घर आहे. मी काका काकींच्या घरी आले आहे. असेही सुळे यांनी म्हटलं आहे.