IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

मोदींचा नेशन फर्स्ट तर विरोधकांचा भ्रष्टाचार फर्स्ट अजेंडा : एकनाथ शिंदे

Thursday, Apr 11
IMG

सत्तेच्या खुर्ची मिळाली पाहिजे हे वाटणारे विरोधक मोदी द्वेषाने पछाडले आहेत. ज्यांचं आयुष्य रोख पैसे मोजण्यात आणि भ्रष्टाचारात गेलं त्यांनी मोदींवर आरोप करु नये.

रामटेक, दि. ११ : एनडीएकडे आत्मविश्वास आहे, इंडिया आघाडीकडे अहंकार आहे. आत्मविश्वास विजयाकडे घेऊन जातो, अहंकार विनाशाकडे घेऊन जातो. इंडिया आघाडीच्या अहंकाराची लंका जनता जाळून खाक करेल यात शंका नाही. त्यांच्याकडे ना नीती आहे ना, निर्णय. त्यांचा अजेंडा आहे भ्रष्टाचार प्रथम. पण मोदींचा अजेंडा आहे नेशन फर्स्ट.   सत्तेच्या खुर्ची मिळाली पाहिजे हे वाटणारे विरोधक मोदी द्वेषाने पछाडले आहेत. ज्यांचं आयुष्य रोख पैसे मोजण्यात आणि भ्रष्टाचारात गेलं त्यांनी मोदींवर आरोप करु नये. मराठीत एक म्हण आहे, अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ. अशी त्यांची अवस्था आहे. मोदींवर ते वारंवार करतात, मोदी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. मोदींना थोडीशी नजर त्यांच्याकडे फिरवली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्याच्या तोंडून फेस येईल असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. हाथी चले बाजार ही पण म्हण तुम्हाला माहीत असेलच. २०१४ ला ज्यांनी टीका केली त्यांना जनतेने घरी बसवलं. २०१९ ला आरोप केले त्यांनाही जनतेने घरी बसवलं. आता हे इतके आरोप करत आहेत की मतांचे सगळे रेकॉर्ड मोदीच तोडतील. १४० कोटी लोक मोदींबरोबर आहेत.

Share: