महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले असताना महायुतीच्या जागा का घोषित केल्या जात नाहीत असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मुंबई, दि. ११ : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला १२ एप्रिलपासून सुरुवात होत असताना अजूनही महायुतीच्या जागांचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. मुंबईतील दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई या ३ जागा तसेच ठाणे, छत्रपती संभाजीनगर, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि अशा ८ जागांवर अजूनही महायुतीमध्ये तिढा कायम आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले असताना महायुतीच्या जागा का घोषित केल्या जात नाहीत असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.