IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

पोपटांकडून संविधान बदलले जाणार असल्याचा अपप्रचार; मोदींचे संविधान मजबूतीसाठी प्रयत्न : फडणवीस

Thursday, Apr 11
IMG

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासह विदर्भाचा विकास होत आहे.

नागपूर, दि. ११ : काँग्रेसच्या पोपटांकडून संविधान बदलले जाणार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. जोपर्यंत चंद्र-सूर्य तारे आहेत तोपर्यंत कोणीही संविधान बदलू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संविधान अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासह विदर्भाचा विकास होत आहे. समृद्धी महामार्ग आता भंडारा, गोंदियापर्यंत नेणार आहोत. त्यामुळे या भागाचा अधिक विकास होईल. 5 वर्षांत मोदींनी 50 कोटी लोकांच्या घरात पाणी पोहोचवले आहे, रामटेकमधील राम मंदिरासाठी आम्ही निधी दिला, असे फडणवीस  म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागपूरच्या कन्हानमध्ये जाहीर सभा पार पडली. ही सभा नागपूर आणि भंडारा गोंदिया या तीन लोकसभा मतदारसंघासाठी एकत्रित होती. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. 

Share: