उत्तम जानकर हे धनगर समाजाचे मोठे नेते. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत.
माढा, दि. २० : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेले उत्तम जानकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला पाठींबा दर्शविला आहे. उत्तम जानकरांनी माढ्यात जाऊन धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. आपण आता अजितदादांच्या गटात आहोत, पण बारामतीमध्ये अजितदादांचा पराभव करूनच आपण पक्ष सोडणार आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे निवडून येईपर्यंत आणि घड्याळ चिन्ह घेऊन आल्यावरच मी शरद पवारांच्या पक्षात येणार, असं चॅलेंज उत्तम जानकर यांनी घेतलं आहे.उत्तम जानकर हे धनगर समाजाचे मोठे नेते. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. माढ्यातील माळशीसर हा त्यांचा गड आहे. जानकरांनी आता माढ्यात मोहिते पाटलांबरोबर जुळवून घेतलं आहे. अशा वेळी त्यांनी थेट अजित पवारांनाच चॅलेंज केले आहे. अजित पवारांना बारामतीत हरवणार मगच त्यांचा पक्ष सोडणार असा पणच त्यांनी केला आहे. धैर्यशील मोहिते पाटलांना काही झालं तरी खासदार करणार असेही ते म्हणाले. भाजपने आपली फसवणूक केली असा आरोपही त्यांनी केला. फडणवीसांना भेटायला विमानाने गेलो होतो हे खरं आहे. पण त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो होतो. दहा वर्ष तुम्ही फुकट का घालवली अशी विचारणा त्यांना केली होती.