कोणीही उभे राहीले तरी ते पडणार हे निश्चित असल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
रत्नागिरी, दि. १६ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपचे नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे काही अदृश्य शक्तींचा हात आहे, हे हात नागपूरात आहेत की काय असा प्रश्न आम्हाला पडला आहे. त्यामुळेच त्यांची उमेदवारी जाहीर होत नाही, या मतदार संघात महायुतीचे दोघे जण इच्छुक आहेत. दोघेही आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण दोघा पैकी कोणीही उभे राहीले तरी ते पडणार हे निश्चित असल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.राऊत यांचा एक लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने विजय होईल असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या वेळी भाजप आमच्या बरोबर होते. आता आम्ही त्यांच्यापासून काडीमोड घेतला आहे. मतदार संघात गेल्या 10 वर्षात राऊतांचा संपर्क चांगला आहे. मोदींची आश्वासन खोटी ठरली आहेत. त्यामुळे लोकांचा मोठा पाठींबा मिळत असल्याचे नाईक म्हणाले. निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशी ही लढाई असल्याचे ते म्हणाले. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो राहणारच, नारायण राणेंना तिसऱ्यांदा पराभवाची हॅट्रिक करण्याची संधी आम्ही दुरावणार नाही असं राऊत म्हणाले.