IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

धाराशिवमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान आमदार पाटील उष्माघाताने कोसळले

Wednesday, Apr 17
IMG

कार्यकर्त्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.शेजारी बसून कार्यकर्ते त्यांना वारा घालत होते.

धाराशिव, दि. १७ :  महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरातून शक्तिप्रदर्शन करण्यात आलं होतं. यावेळी शहरातून रॅली काढण्यात आली होती. भर उन्हात काढलेल्या या रॅलीदरम्यान ट्रकवरुन नेतेमंडळी अभिवादन करीत होते. ट्रकवरुन उतरून सभामंचाच्या दिशेने जात असताना आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताचा त्रास झाला. यावेळी अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले.यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.शेजारी बसून कार्यकर्ते त्यांना वारा घालत होते.कार्यकर्त्यांनी गाडीतून त्यांना रुग्णालयात पोहोचवलं.पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Share: