IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना प्रचारसभेत अचानक भोवळ ; उपचारानंतर पुन्हा भाषण

Wednesday, Apr 24
IMG

गडकरी यांना भोवळ आल्यानं व्यासपीठावर उपस्थित लोकांची तारांबळ उडाली.

यवतमाळ, दि. २४ : केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना आज प्रचारसभेत अचानक भोवळ आली. यवतमाळ येथील पुसद येथे महायुतीची आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करत असतानाच त्यांना व्यासपीठावर भोवळ आली.मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक समजले जाणारे नितीन गडकरी हे स्वत: नागपूरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्या मतदारसंघात मतदान झालं. त्यानंतर आता ते देशभरात एनडीए व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.गडकरी यांना भोवळ आल्यानं व्यासपीठावर उपस्थित लोकांची तारांबळ उडाली. लगेचच त्यांना पाणी देण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना बरं वाटलं. काही वेळानंतर त्यांनी व्यासपीठावर येऊन भाषणही केल्याचं समजतं. अति उष्णतेमुळं हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे.या घटनेनंतर नितीन गडकरी यांनी स्वत: ट्वीट केलं आहे. ‘पुसद येथील सभेत उष्णतेमुळं अस्वस्थ वाटलं. मात्र आता मी पूर्णपणे फिट असून पुढील बैठकीला उपस्थित राहण्यासाठी वरुडला रवाना होत आहे. आपली आपुलकी आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद,’ असं ट्वीट नितीन गडकरी यांनी केलं आहे.

Share: